जळगाव - गोमांस आढळल्यानंतर मनपाने अनधिकृत गोडाऊन केले भुईसपाट
जळगाव, 22 ऑगस्ट, (हिं.स.) शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने धडक कारवाई केली. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या पथकाने संबंधित अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त केले. शहरात उघड्यावर मांस
जळगाव - गोमांस आढळल्यानंतर मनपाने अनधिकृत गोडाऊन केले भुईसपाट


जळगाव, 22 ऑगस्ट, (हिं.स.) शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने धडक कारवाई केली. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या पथकाने संबंधित अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त केले. शहरात उघड्यावर मांस विक्री तसेच नियमबाह्य पद्धतीने मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला यापूर्वीच दिले होते. त्यानुसार सुप्रीम कॉलनी परिसरात संशयास्पद गोमांस आढळल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाईचे पाऊल उचलले.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई सुरू केली. गोमांस साठवणूक आणि विक्रीसाठी वापरले जात असल्याचा आरोप असलेले अनधिकृत गोडाऊन पाडण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. महापालिकेच्या या कारवाईनंतर शहरातील बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नियमांचे उल्लंघन करून मांस विक्री, साठवणूक किंवा अन्य अनधिकृत प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande