
बीड, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
बीड जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलिस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यावर कारवाई करण्याकरता सरसावली आहेत.
अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला असून २५.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर डीवायएसपी पथकाने कारवाई केली. रिलायन्स पेट्रोलपंप ते अंबिका चौक बायपास रोडवर सापळा रचून हायवा पकडण्यात आला. तपासणीमध्ये सुमारे ६ ब्रास वाळू आढळून आली. या कारवाईत हायवा, वाळू आणि मोबाईल असा एकूण २५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक जयराम दिगंबर दिंडे आणि वाहनमालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis