त्र्यंबकेश्वर येथे जपानुष्ठान सोहळ्यास उत्साहात प्रारंभ
जगदगुरु शांतीगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन.. नाशिक, 22 ऑगस्ट (हिं.स.)। निष्काम कर्मयोगी,शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज य
Japanushthan at Trimbakeshwar


जगदगुरु शांतीगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन..

नाशिक, 22 ऑगस्ट (हिं.स.)। निष्काम कर्मयोगी,शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वार्षिक नागपंचमी जपानुष्ठान सोहळ्यास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला.

त्र्यंबकेश्वर येथील जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमात आयोजित जपानुष्ठान सोहळ्याचा प्रारंभ पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी नंतर करण्यात आला.यानंतर लक्षवेधी पालखी मिरवणुक संपन्न झाली. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्या प्रसंगी मौनव्रतातील महाजपानुष्ठान,अखंड नंदादीप,हस्त लिखित नामजप,रोज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर नित्यनियम विधी,प्राणायाम,ध्यान,भागवत वाचन,महाआरती,भजन,प्रवचन, सत्संग यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमा दरम्यान शेकडो तास श्रमदान संपन्न होणार असून आश्रम परिसरात वृक्षारोपण देखील होणार आहे.

आठवडाभर जपसाधनेसाठी बसलेल्या हजारो भाविकांचा जीवनभर व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात आला.ज्या भाविकांचे व्यसन चालू होते त्यांच्या कडून व्यसनमुक्तीचा विशेष संकल्प करून घेण्यात आला.व्यसनाच्या तंबाखू,गुटका या पिढ्यांची होळी करण्यात आली.यावेळी भाविकांनी आश्रमातील जगदगुरु बाबाजी, हृदयेश्वर महादेव आणि अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande