
बीड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील बिंदुसरा नदीपात्रात सुरू असलेल्या पुलकम बंधाऱ्याच्या कामाची बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केली. कामाची गती वाढवून बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. पुलकम बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात नदीपात्रात पाणी साठून राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरातील बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून, याचा फायदा बीड शहरातील नागरिकांना होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis