
बीड, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) माजलगाव यांच्यावतीने मोहन जगताप यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक घेण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघातील BLA-2 व SIR प्रक्रियेच्या आढावा बैठकीत गावनिहाय मतदार यादी, बूथनिहाय नियोजन आणि संघटन बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथ सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis