
नांदेड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेडच्या लादगा शिवारात प्रेमप्रकरणातून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी शोध घेऊन ५ तासांत आरोपी अटक करण्यात यश मिळवले आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसारनांदेडच्या लादगा शिवारात प्रेमप्रकरणातून ६० वर्षीय बाबू पुंडलिक गायकवाड यांचा चाकूने वार करून खून करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नीवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला. घटनेनंतर पसार झालेल्या किशन जोगदंड, सोहम बयास उर्फ सोन्या आणि मंगेश लिंगे या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा व मुखेड पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या ५ तासांत ताब्यात घेतले. प्रकरणी मुखेड पोलिसांत खुनासह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis