छ. संभाजीनगर - राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने `नारी हुंकार` काव्य मैफिल समारंभ संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने आयोजित समस्त महिलाशक्तीच्या सन्मानाला समर्पित असा `नारी हुंकार` हा काव्य मैफिल समारंभ राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आज मह
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने आयोजित समस्त महिलाशक्तीच्या सन्मानाला समर्पित असा `नारी हुंकार` हा काव्य मैफिल समारंभ राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आज महिला शिक्षण, उद्योग, प्रशासन, कला, क्रीडा, विज्ञान आणि सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्यांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन देणे, हीच सशक्त आणि समताधिष्ठित समाजाची खरी ओळख आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

महिलाशक्तीच्या सन्मानाला समर्पित असा `नारी हुंकार` हा काव्य मैफिल समारंभात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande