नाशिक : पिंपळगाव कडवा कॅनलजवळ टाटा मॅजिक उलटला; चालकाचा मृत्यू
नाशिक, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सिन्नर तालुक्यातील पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा कॅनलजवळ शनिवारी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास टाटा मॅजिक वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनचालक अलीम आदम सहा (वय ३०, रा. मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाल
One died on the spot five


नाशिक, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सिन्नर तालुक्यातील पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा कॅनलजवळ शनिवारी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास टाटा मॅजिक वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनचालक अलीम आदम सहा (वय ३०, रा. मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, तीन जण सुखरूप असल्याचे समजते.

अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक एम एच२० बीसी ७२६४ असा आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर गेल्या तीन दिवसांत तब्बल नऊ अपघाती घटना घडल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या रस्त्यावर अद्याप आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मार्ग स्पष्ट दिसण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande