राज्यातील लिंगायत समाजासाठी अमृतच्या योजनांचा मार्ग मोकळा; चाकूरकर यांचे लाभ घेण्याचे आवाहन
लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या संस्थेच्या लक्षित गटामध्ये हिंदू लिंग
अर्चना पाटील चाकूरकर


लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या संस्थेच्या लक्षित गटामध्ये हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा समावेश करण्याचा शासनादेश इतर मागास बहुजन कल्याण विभागाने जारी केला आहे या आदेशानुसार हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत या समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास नागरिक व विद्यार्थ्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.

विशेषतः शिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारासाठीच्या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी मार्ग खुला झाला हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील जे नागरिक किंवा विद्यार्थी इतर मागासवर्गीय अथवा अन्य कोणत्याही राखीव प्रवर्गाचा किंवा स्वतंत्र महामंडळाच्या योजनांचा लाभ घेत नाहीत त्यांना अमृतच्या योजनांचा लाभ घेता येईल त्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे तसेच शासनाने निश्चित केलेले आर्थिक निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे दरम्यान या समाज घटकातील विद्यार्थ्यांचा अमृत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रशिक्षण योजनांमध्ये समावेश करण्याचे निर्देश संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहेत या संधीचा हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत त्यासोबतच ब्राह्मण मारवाडी अशा एकूण २६ जातीच्या विद्यार्थी व युवकांचे युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande