अमरावती : रक्षाबंधन निमित्त रविवारी टपाल कार्यालय राहणार सुरू
राखी मेल बुकिंगसाठी विशेष काऊंटर अमरावती, 22 ऑगस्ट (हिं.स.)। राखी पर्वानिमित्त अमरावती टपाल विभागात विशेष उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांना राखी मेल बुकिंगची सुविधा अधिक सुलभ व्हावी यासाठी रविवार (ता.२३) विविध टपाल कार्यालयांमध्ये राखी मेल बुक
अमरावती : रक्षाबंधन निमित्त रविवारी टपाल कार्यालय राहणार सुरू


राखी मेल बुकिंगसाठी विशेष काऊंटर

अमरावती, 22 ऑगस्ट (हिं.स.)। राखी पर्वानिमित्त अमरावती टपाल विभागात विशेष उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांना राखी मेल बुकिंगची सुविधा अधिक सुलभ व्हावी यासाठी रविवार (ता.२३) विविध टपाल कार्यालयांमध्ये राखी मेल बुकिंगसाठी विशेष काउंटर कार्यरत राहणार आहे. या संधीचा अधिकाधिक फायदा घेण्याचे आवाहन अमरावती टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक पी. ए. गेडाम यांनी केले आहे.

अमरावती व परतवाडा मुख्य डाकघर, अमरावती उप कॅम्प डाकघर, अचलपूर, बडनेरा, अंजनगाव, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, व्हीएमव्ही, रुख्मिणीनगर, शिवाजीनगर, राजापेठ, वरुड, साईनगर, वलगाव व दर्यापूर उपडाकघर येथे या दिवशी राखी मेल बुकिंगसाठी विशेष काउंटर सुरू राहील. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व आपल्या राखी वेळेत पोहोचण्यासाठी आगाऊ बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande