
छत्रपती संभाजीनगर, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील समतानगर परिसरात गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या ४९ वर्षीय रिक्षाचालकाला अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २ किलो ८१३ ग्रॅम गांजा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे सार्वजनिक स्वच्छता गृहाजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, पोउपनि. उत्रेश्वर मुंडे व पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis