
नांदेड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड शहरातील नमस्कार चौक परिसरात विनापरवाना धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपीकडून दोन तलवारी आणि एक खंजर जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. नांदेड शहरात अलीकडे झालेल्या गुन्ह्याच्या घटनेनंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis