
छत्रपती संभाजीनगर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. आंदोलनाच्या निमित्ताने विविध राजकीय हालचाली देखील सुरू झाले आहेत. मराठा मावळा संघटना जरांगे पाटील यांच्या आंदोलनासोबत असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला असून, या आंदोलनाला मराठा मावळा संघटनेचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे पाटील यांनी दिली. शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे संघटनेच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण आणि सुरू असलेल्या लढ्याबाबत चर्चा करण्यात आली. या भेटीत हनुमंत कदम पाटील, भरत कदम, गोपीनाथ निकम, अमित जाधव, संदीप काळे, संजय गायके, गणेश शेळके, सोमनाथ जिवरग आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis