भक्त संप्रदाय कलेतच कलावंताचे अर्ज आक्षेप नोंदविण्यासाठी प्रशासनाकडून १५ दिवसांचा कालावधी
यवतमाळ, 22 ऑगस्ट (हिं.स.) राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमधील कलावंत, साहित्यिकांचे अर्ज प्राप्त झाले आहे. साहित्यिक व प्रयोगात्मक, संघटित, असंघटित पारंपरिक लोककला तसेच भक्ती संप्रदाय या तीन कलेत अर्ज दाखल करणे आ
भक्त संप्रदाय कलेतच कलावंताचे अर्ज आक्षेप नोंदविण्यासाठी प्रशासनाकडून १५ दिवसांचा कालावधी


यवतमाळ, 22 ऑगस्ट (हिं.स.)

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमधील कलावंत, साहित्यिकांचे अर्ज प्राप्त झाले आहे. साहित्यिक व प्रयोगात्मक, संघटित, असंघटित पारंपरिक लोककला तसेच भक्ती संप्रदाय या तीन कलेत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. परंतु, एकाच कलेत जास्त अर्ज आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची निवड होऊ शकली नाही. अशा लाभार्थ्यांना आता आक्षेप दाखल करता येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पाच सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमधील २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५, २०२५-२६ या चार वर्षात हजारो कलावंत व साहित्यिकांनी अर्ज दाखल केले आहे. प्रत्यक्षात मात्र, साहित्यिक व प्रयोगात्मक कलाप्रकाराकरिता ३० टक्के, संघटित, असंघटित पारंपरिकसाठी ६० आणि १० टक्के भक्ती संप्रदाय या कला प्रकारामध्ये अर्ज दाखल करणे गरजेचे होते. मात्र, बहुतांश लाभार्थ्यांनी केवळ भक्ती संप्रदाय कलेतच अर्ज केले आहे. आता निवड झाली नाही म्हणून बहुतांश लाभार्थी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या जात आहे. प्रत्यक्षात मात्र भक्ती संप्रदाय कलेतून लाभार्थ्यांची निवड केवळ दहा टक्केच करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीकडे आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आक्षेप स्वीकारल्या जाणार आहे. या आक्षेपाची सुनावणी घेऊन निराकरण केले जाणार आहे.

कलावंताचे तीन हजार ६८६ अर्ज

राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजना पूर्वी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत होती. तेव्हा तीन वर्षांची निवड रखडली होती. त्या तीन वर्षांत मिळून दोन हजार ४१२ कलावंतांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, २०२५-२६ मध्ये पंचायत विभागाकडे योजना वळविल्यानंतर एक हजार २७४, असे मिळून तीन हजार ६८६ कलावंताचे अर्ज पात्र ठरले आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यानंतरही निवड प्रक्रिया विविध कारणामुळे रेंगाळलेली होती.

---------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande