जायकवाडी धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर; मराठवाड्याला मोठा दिलासा
Ppछत्रपती संभाजीनगर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील नाथसागर अर्थात जायकवाडी धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर असून धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ९४.७२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत जा
जायकवाडी धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर; मराठवाड्याला मोठा दिलासा


Ppछत्रपती संभाजीनगर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील नाथसागर अर्थात जायकवाडी धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर असून धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ९४.७२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या २४ तासांत जायकवाडी धरणात ७,७१९ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. १ जूनपासून आतापर्यंत तब्बल ६३.३४ टीएमसी पाणी धरणात दाखल झाले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून १,३०० क्युसेक, तर डाव्या कालव्यातून २,००० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने मराठवाड्यातील पाणीप्रश्नाला मोठा दिलासा मिळणार आहे. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक अशीच सुरू राहिल्यास नाथसागर तुडुंब भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande