
रायगड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। : खोपोलीचे उपनगराध्यक्ष श्री. विक्रमशेठ साबळे यांच्या राजकीय, सामाजिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘नवराष्ट्र’च्या वतीने त्यांना ‘आदर्श उपनगराध्यक्ष’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
विक्रमशेठ साबळे यांनी खोपोली शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करताना नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. सामाजिक उपक्रमांसह शहराच्या विकासाशी संबंधित विविध कामांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘नवराष्ट्र’ने त्यांची ‘आदर्श उपनगराध्यक्ष’ पुरस्कारासाठी निवड केली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर विक्रमशेठ साबळे यांनी हा सन्मान आपल्या कार्याला मिळालेली प्रेरणा असल्याचे सांगत भविष्यातही खोपोलीच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सन्मानामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विक्रमशेठ साबळे यांच्या पुढील सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)