
बीड, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
बीडच्या वडवणीत दोन गटांत तुफान दगडफेक; शहरात तणावाचे वातावरण असल्याची परिस्थिती शनिवारी पाहायला मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या शांतता असून गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
वडवणी शहरात दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त वाढवला.
खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळातच शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून, परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
दगडफेकीमागील नेमके कारण काय? या घटनेत कोणाला दुखापत झाली आहे का? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis