
नांदेड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड येथे दिनांक 30 ऑगस्ट रोजी व्हॉईस ऑफ मीडियाचा मराठवाडा स्तरीय केडर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील राज्य,मराठवाडा कार्यकारणी वरील सर्व पदाधिकारी, परभणी जिल्हा कार्यकारणी, सर्व तालुका कार्यकारणी, महानगर कार्यकारणी, साप्ताहिक, डिजिटल विंग यांच्या पदाधिकारी सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
परभणी जिल्हा कार्यकारिणी, महानगर कार्यकारिणी यांच्यातील जे पदाधिकारी, सदस्य येणार आहेत. त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री बालासाहेब काळे, श्री गणेश पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी, मारुती जुंबडे यांच्याकडे नोंदणी करावी. महानगर सदस्यांनी महानगर अध्यक्ष नरहरी चौधरी, कार्याध्यक्ष विष्णू सायगुंडे यांच्याकडे नोंदणी करावी. ग्रामीण भागातील सदस्यांनी आपापल्या तालुका अध्यक्षांच्या कडे नोंदणी करावी.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis