रत्नागिरी : शतकोत्सवी राजापूर गणेशोत्सवानिमित्त मुलांसाठी स्पर्धा
रत्नागिरी, 22 ऑगस्ट, (हिं.स.) । राजापूर येथील शंभराव्या वर्षाच्या वाटचालीनिमित्त राजापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मुलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राजापूरमध्ये १९२६ मध्ये तत्कालीन समाजधुरिणांनी स्थापन केलेले मारुती मंदिर धर्मशाळा ये
रत्नागिरी : शतकोत्सवी राजापूर गणेशोत्सवानिमित्त मुलांसाठी स्पर्धा


रत्नागिरी, 22 ऑगस्ट, (हिं.स.) । राजापूर येथील शंभराव्या वर्षाच्या वाटचालीनिमित्त राजापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मुलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राजापूरमध्ये १९२६ मध्ये तत्कालीन समाजधुरिणांनी स्थापन केलेले मारुती मंदिर धर्मशाळा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शंभर वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने विविझ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांची निवड झाली आहे. शतकपूर्ती महोत्सवानिमित्त लहान मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मंडळातर्फे रविवार, २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गायन, नाटिका, नक्कल, नृत्य आणि वाद्यवादन अशा पाच प्रकारांमध्ये बालकलाकारांना आपली कला सादर करता येणार आहे. राजापूर शहर व परिसरातील जास्तीत जास्त बालकलाकारांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी डॉ. सुयोग परांजपे (९८६००९१२२१) आणि डॉ. शुभम कुशे (९५२७६४४८४५) यांच्याशी संपर्क साधावा, असे मंडळाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande