चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीसाठी एआय आधारित कृती आराखडा
पुणे, 22 ऑगस्ट (हिं.स.)। चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित विश्लेषणाच्या माध्यमातून सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत
चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीसाठी एआय आधारित कृती आराखडा


पुणे, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित विश्लेषणाच्या माध्यमातून सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. तसेच, परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवणे आणि आवश्यक प्राथमिक सुधारणांची कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.चाकण परिसरातील वाहतूक नियोजन, वाहनतळ आणि रस्ते व्यवस्थापनाबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतुकीचे एआयच्या माध्यमातून विश्लेषण करून त्याआधारे दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये रस्ते व्यवस्थापन, वाहनतळ आणि वाहतूक नियोजनाचा समावेश असेल.एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी परस्पर समन्वयाने काम करावे. निर्धारित कालमर्यादेत रस्ते दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande