एचसीएमटीआरच्या भूसंपादनासाठी तीन हजार कोटींची गरज
पुणे, 22 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित उच्च द्रुतगती वर्तुळाकार उन्नत मार्ग अर्थात एचसीएमटीआरच्या भूसंपादनासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी दीड हजार कोटी रुपये पुणे महापालिकेच्या मुदत ठ
एचसीएमटीआरच्या भूसंपादनासाठी तीन हजार कोटींची गरज


पुणे, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित उच्च द्रुतगती वर्तुळाकार उन्नत मार्ग अर्थात एचसीएमटीआरच्या भूसंपादनासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी दीड हजार कोटी रुपये पुणे महापालिकेच्या मुदत ठेवींमधून वापरण्याचे नियोजन असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या संदर्भात मिसाळ यांनी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

एचसीएमटीआरसह तळजाई ते हिंगणे आणि पाषाण ते पंचवटी या बोगदा प्रकल्पांसह इनर रिंग रोडला कालबद्ध पद्धतीने गती देण्याची आवश्यकता असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. भूसंपादन, निधी आणि विविध परवानग्यांमधील तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधणारी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.एचसीएमटीआरच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या तीन हजार कोटी रुपयांपैकी दीड हजार कोटी रुपये महापालिकेच्या मुदत ठेवींमधून उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, या निधीच्या वापरामुळे महापालिकेच्या अन्य विकासकामांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना मिसाळ यांनी अधिकाऱ्यांना केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande