खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची महिला व बालविकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर नियुक्ती
सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती नागनाथ वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १७ ऑगस्ट रोजी जारी के
Joyti wagmare


सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती नागनाथ वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे.राज्यसभेवर निवड झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात डॉ. वाघमारे यांनी महिला, बालक, कामगार आणि सामाजिक प्रश्नांवर भूमिका मांडली होती. विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्या सभागृहात आवाज उठवत आहेत.महिलांचे आरोग्य, सुरक्षा आणि सक्षमीकरण, तसेच बालकांचे पोषण, शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकास या विषयांवर केंद्र सरकारला धोरणात्मक सल्ला देण्याचे काम या समितीमार्फत केले जाते.या नियुक्तीचे अधिकृत पत्र डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वीकारले. त्यांच्या नियुक्तीबद्दल सोलापूरसह राज्यातील विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande