सोलापूर महापालिकेची ३५ कोटी ५० लाखांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत
सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, जीएसटी अनुदान आणि डीसीपीएस निधीची एकूण ३५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या रकमेवर वार
सोलापूर महापालिकेची ३५ कोटी ५० लाखांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत


सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, जीएसटी अनुदान आणि डीसीपीएस निधीची एकूण ३५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या रकमेवर वार्षिक ७.२० टक्के व्याजदर मिळणार आहे.स्थायी समितीची सभा सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे १८ कोटी रुपये, जीएसटी अनुदानाचे १० कोटी रुपये आणि डीसीपीएस निधीचे ७ कोटी ५० लाख रुपये अशा एकूण ३५ कोटी ५० लाख रुपयांच्या मुदतठेवीला मान्यता देण्यात आली. महापालिकेने मुदत ठेवीसाठी राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांकडून व्याजदर मागविले होते. प्राप्त दरपत्रकांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेने ७.२० टक्के हा सर्वाधिक वार्षिक व्याजदर देऊ केला. त्यामुळे संबंधित बँकेत रक्कम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे महापालिकेच्या निधीला तुलनेने अधिक व्याज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande