
बीड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअपवर डीवायएसपी पथकाने कारवाई करत १० गोवंशीय जनावरांसह १२ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बीड-परळी रोडवरील कोहिनूर लॉन्स ते सम्राट परिसरात सापळा रचून MH-23-AU-8142 क्रमांकाचे पिकअप वाहन अडवण्यात आले. वाहनात जनावरांची दाटीवाटीने व निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचे आढळले. या प्रकरणी अरशियान रफिक पठाण आणि रिझवान सादिक कुरेशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis