
जालना, 24 ऑगस्ट (हिं.स.)।
श्री शिवस्वरूप जनार्दन स्वामी आणि जय जनार्दन भक्त परिवार, जाफ्राबाद यांच्या वतीने आयोजित ३११ कि.मी. च्या पायी कावड यात्रेचे आज जाफ्राबाद येथे आगमन झाले. याप्रसंगी भाजप आमदार संतोष दानवे यांनी उपस्थित राहून कावड यात्रेस भेट देत यात्रेमध्ये सहभागी झालो.
ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथून निघालेला हा भक्तिमय प्रवास अखंड शिवनामस्मरण, अथांग श्रद्धा आणि शिस्तीच्या बळावर पूर्ण करत सर्व भाविक आज जाफ्राबाद नगरीत दाखल झाले. ऊन-पावसाची पर्वा न करता केवळ भक्तीच्या जोरावर इतका मोठा पायी प्रवास पूर्ण करणाऱ्या सर्व शिवभक्तांचा उत्साह आणि समर्पण निश्चितच अत्यंत प्रेरणादायी आहे. या मंगलमय प्रसंगी महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन भाविकांसोबत या भक्तीपर्वाचा साक्षीदार होता आले, याचे मनाला अपार समाधान लाभले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis