नांदेड : मीनलताई पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाला आ. सईद खान यांची सदिच्छा भेट
नांदेड, २४ ऑगस्ट (हिं.स.) : शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार सईद खान यांनी नांदेड येथे नगरसेविका मीनल गजानन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सईद खान यांच्यासोबत परभणी-हिंगोली जिल्हाप्रमुख
अ


नांदेड, २४ ऑगस्ट (हिं.स.) : शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार सईद खान यांनी नांदेड येथे नगरसेविका मीनल गजानन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी सईद खान यांच्यासोबत परभणी-हिंगोली जिल्हाप्रमुख तसेच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांच्या भूमिकेचाही उल्लेख करण्यात आला. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचारांसोबत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अल्पसंख्याक समाजापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत असलेला दांडगा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य हे शिवसेनेसाठी महत्त्वाची ताकद असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

भेटीदरम्यान आमदार सईद खान यांनी मीनल पाटील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande