मांजरा महिला अर्बनचा सहावा वर्धापनदिन उत्साहात; ‘वर्धापन समृद्धी योजने’चा शुभारंभ
मांजरा महिला अर्बनचा सहावा वर्धापनदिन उत्साहात ‘वर्धापन समृद्धी योजना’ जाहीर; १०० दिवसांसाठी ९ टक्के व्याजदराचा विशेष लाभ लातूर, २४ ऑगस्ट (हिं.स.) : मांजरा महिला अर्बनच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी संस्
मांजरा महिला अर्बन वर्धापन दिन


मांजरा महिला अर्बनचा सहावा वर्धापनदिन उत्साहात

‘वर्धापन समृद्धी योजना’ जाहीर; १०० दिवसांसाठी ९ टक्के व्याजदराचा विशेष लाभ

लातूर, २४ ऑगस्ट (हिं.स.) : मांजरा महिला अर्बनच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेच्या वतीने ‘वर्धापन समृद्धी योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत १०० दिवसांसाठी ९ टक्के व्याजदर देण्यात येणार असून, विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या योजनेत विशेष लाभाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेविका रागिणी यादव, शोभा पाटील, संगीता मिरचे, स्थायी समिती सदस्या स्वाती घोरपडे, छाया बांदगर तसेच माजी नगरसेविका श्वेता लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्रद्धा जगताप, सुजाता अजनिकर (पीपल्स महिला अर्बनच्या चेअरमन), भालचंद्र सोनकांबळे, रंगनाथ बांदगर, शहर जिल्हाध्यक्ष प्रविण कांबळे, विक्रम करमाळे, अक्षय सुरवसे, प्राप्ती वाघमारे, विनायक जंगले, पांडुरंग भिसे, जे. जी. बिराजदार, एम. एल. जाधव आणि श्रीशैल्य कोरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मांजरा महिला अर्बनने गेल्या सहा वर्षांच्या वाटचालीत ग्राहक, सभासद आणि खातेदारांचा विश्वास संपादन केला आहे.

आर्थिक क्षेत्रातील कामासोबतच महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य संस्थेकडून करण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जात असून, ‘वर्धापन समृद्धी योजना’ हे त्याच दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सहाव्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या ९ टक्के व्याजदराच्या योजनेला सभासद, खातेदार आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका सुरवसे आणि सचिव रोहिणी धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक प्राप्ती वाघमारे यांच्यासह पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande