बीड जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)बीड जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करून, मनमोकळा संवाद साधला. वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. बी. एस
अ


बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)बीड जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करून, मनमोकळा संवाद साधला.

वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. बी. एस. बोडखे साहेब, उपाध्यक्षपदी ऍड. गोपाल सर्वज्ञ, सचिवपदी ॲड. नितीन शिंदे तर ग्रंथपालपदी ॲड. वनदेव सूळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा म्हणून वकील संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा वकील संघाची वाटचाल अधिक सक्षम, सकारात्मक आणि समाजाभिमुख होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच उपस्थित सर्व वकिल बांधवांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी माजी अध्यक्ष ऍड. रोहिदास येवले, माजी सचिव ऍड. शहादेव ननवरे, मावळते माजी अध्यक्ष ऍड. सुभाष पिसोरे यांच्यासह ऍड. राजू शिंदे व ऍड. वाय. पी. अनवणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande