सत्याग्रहातील घोषणांवरून चार जणांविरुद्ध गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
नांदेड, 24 ऑगस्ट (हिं.स.)। काँग्रेस पक्षाच्या सत्याग्रह आंदोलनादरम्यान कथित आक्षेपार्ह घोषणा देऊन हिंदू धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता मधील कलम 299,
सत्याग्रहातील घोषणांवरून चार जणांविरुद्ध गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप


नांदेड, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

काँग्रेस पक्षाच्या सत्याग्रह आंदोलनादरम्यान कथित आक्षेपार्ह घोषणा देऊन हिंदू धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता मधील कलम 299, 302 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांना दिलेल्या FIR नुसार, तक्रारदार पीएमआय एजंट असून हिंदू विश्व परिषद, नांदेड जिल्हा महामंत्री असल्याचे नमूद आहे. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.तक्रारीनुसार, नांदेड येथील आयटीआय चौकात काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी कथितरीत्या अशा घोषणा दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घोषणांचा व्हिडिओ फेसबुकवर पाहिल्याने आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित घोषणा देणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तक्रारदाराचा जबाब शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मराठीत टंकलिखित करून घेण्यात आला असून, तो वाचून पाहिल्यानंतर बरोबर असल्याचे त्यांनी मान्य केले.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नोंदविला. गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी पोलिस निरीक्षक राजेश अशोकराव पुरी यांच्याकडे देण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande