चंद्रपूर - राजुरा शहरात गोळीबाराने दहशत; एकाचा मृत्यू
चंद्रपूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। राजुरा शहरात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तालुका न्यायालयासमोरील नारळपाण्याच्या दुकानाजवळ झालेल्या गोळीबाराने शहर हादरले. सोमनाथपूर येथील विनोद ऊर्फ पापा जाधव यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी समोरा
चंद्रपूर - राजुरा शहरात गोळीबाराने दहशत; एकाचा मृत्यू


चंद्रपूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

राजुरा शहरात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तालुका न्यायालयासमोरील नारळपाण्याच्या दुकानाजवळ झालेल्या गोळीबाराने शहर हादरले. सोमनाथपूर येथील विनोद ऊर्फ पापा जाधव यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी समोरासमोर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर दोन्ही हल्लेखोरांनी राजुरा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. करण मेकलवार (२२) आणि दीपक बाविसकर (२४) अशी त्यांची नावे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande