राजापुरात मंगळवारी फोटोग्राफर-व्हिडीओग्राफरसाठी सिनेमॅटिक कार्यशाळा
रत्नागिरी, 24 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन आणि तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने सोनी कंपनी व सारडा ग्रुप यांच्या प्रायोजकत्वातून ॲडव्हान्स सिनेमॅटिक मास्टर क्लास या मोफत कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी, दि. २५ ऑगस
राजापुरात मंगळवारी फोटोग्राफर-व्हिडीओग्राफरसाठी सिनेमॅटिक कार्यशाळा


रत्नागिरी, 24 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन आणि तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने सोनी कंपनी व सारडा ग्रुप यांच्या प्रायोजकत्वातून ॲडव्हान्स सिनेमॅटिक मास्टर क्लास या मोफत कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी, दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथील हॉटेल गुरुमाऊली येथे होणार आहे.

कार्यशाळेत सोनी कंपनीच्या वतीने अभिजीत पाबरेकर हे अद्ययावत कॅमेरे व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. तसेच शरद पोखरकर आणि शरद सारडा हे सिनेमॅटिक व्हिडीओग्राफीसंदर्भात व्यावसायिक मार्गदर्शन करणार आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर बंधूंनी या मोफत कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. हे आवाहन फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुका अध्यक्ष प्रीतेश देवळेकर, जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, सचिव प्रवीण पाटोळे, खजिनदार सुरेंद्र गीते आणि संघटक संदेश टिळेकर यांनी केले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी जिल्हा कार्याध्यक्ष गुरु चौगुले यांच्याशी ९७३०४१४४४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande