बीड जिल्ह्यातील गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष
बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या वतीने जिल्ह्यातील गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत
अ


बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या वतीने जिल्ह्यातील गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’ सुरू करण्यात आला आहे.

वैद्यकीय मदतीची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी हा सहायता कक्ष नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. गरजू रुग्णांना आवश्यक ती मदत मिळावी आणि त्यांच्या अडचणींवर तत्परतेने कार्यवाही व्हावी, यासाठी या कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.बीड जिल्ह्यातील रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय मदत, समस्या किंवा आवश्यक त्या सहाय्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 9657355113 वर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande