अहमदपूरला ड्रेनेज मंजूर : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। अहमदपूर येथे बाहेरून राष्ट्रीय महामार्ग 361 गेल्यानंतर शहरातल्या रस्त्यांची चाळण मोठ्या प्रमाणात झाली होती. हे लक्षात घेऊन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर शहरातली व चाकूर शहरात सुद्धा सिमेंट रस्ता व्हावा यासा
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील


लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

अहमदपूर येथे बाहेरून राष्ट्रीय महामार्ग 361 गेल्यानंतर शहरातल्या रस्त्यांची चाळण मोठ्या प्रमाणात झाली होती. हे लक्षात घेऊन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर शहरातली व चाकूर शहरात सुद्धा सिमेंट रस्ता व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे चाकूर शहरात सिमेंट रस्ता व अंतर्गत नाली ही मंजूर करण्यात आली व तिचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तसेच अहमदपूर शहरातही रस्त्याचे काम मोठ्या वेगाने सुरू होते मात्र त्या ठिकाणी अंदाजपत्रकात ड्रेनेज चा उल्लेख नव्हता. अहमदपूर शहर हे वाढते लोकसंख्येचे शहर असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूने ड्रेनेज आवश्यक्य आहे ते करणे गरजेचे आहे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सहकार मंत्री पाटील यांनी पटवून दिले. याचाही पाठपुरावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केला व राष्ट्रीय महामार्गाने आता अहमदपूर शहरात होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग लगत सिमेंट रस्त्याला दोन्ही बाजूने ड्रेनेज करण्याचा निर्णय केला असून त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे व लवकरच अहमदपूर शहरात दोन्ही बाजूने ड्रेनेजचे काम सुरू होणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande