छ. संभाजीनगर : शेंद्रा येथे मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, शेंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल
छ. संभाजीनगर : शेंद्रा येथे मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, शेंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, शेंद्रा, जि. छत्रपती संभाजीनगर येथे हा मेळावा होणार आहे, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश बहुरे यांनी कळविले आहे.

छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे येथील विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मेळाव्यास उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. या मेळाव्यात विविध १७ आस्थापनांकडून १ हजार २८९ रिक्तपदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. एनव्हिरो डेव्हलपमेंट सोल्यूशन, चंद्रिकला इंजिनिअरिंग प्रा. लि., रुचा इंजिनिअरिंग, बजाज इलेक्ट्रिकल्स, इंसेफ सर्व्हिसेस प्रा. लि., फोर्ब्स प्रिसिजन टूल्स प्रा. लि., बी. जी. इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, डिस्टील एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि., नेक्सलिड कन्सल्टिंग एलएलपी, लेबरनेट इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि., बजाज ऑटो लि., परकिन्स इंडिया प्रा. लि., भारत फोर्ज लि., पुणे, व्हॅलिओ इंडिया प्रा. लि., पुणे, एम. जी. कॉर्पोरेशन, स्टरलाइट टेक्नॉलॉजी लि. आणि नायडेक ग्लोबल अप्लायन्स या १७ आस्थापनांकडून एकूण १ हजार २८९ रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.या पदांसाठी कोणत्याही शाखेची पदवी, अभियांत्रिकी पदवी, पदविका, आयटीआय, बारावी तसेच दहावी उत्तीर्ण अशा विविध शैक्षणिक पात्रताधारक युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रोजगार नोंदणी असलेल्या उमेदवारांनी महास्वयं रोजगार www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून ऑनलाइन अर्ज करावा. तसेच आपल्या बायोडाटाच्या १५ प्रती घेऊन प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून मुलाखतीमध्ये सहभागी व्हावे. संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदांसाठी अर्ज करताना अडचण आल्यास दूरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, शेंद्रा यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande