ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान परिसराच्या कामांची आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचेकडून पाहणी
कोल्हापूर, 24 ऑगस्ट (हिं.स.) | कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान परिसरातील उर्वरित कामांची महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांसमवेत प्रत्यक्ष पाहण
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, अधिकारी व ठेकेदार


कोल्हापूर, 24 ऑगस्ट (हिं.स.) | कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान परिसरातील उर्वरित कामांची महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामे वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले.

मैदानातील गवत काढण्याचे व स्वच्छतेचे काम पूर्ण झाले असून, सतत गवत काढणे, औषध फवारणी, झाडे-झुडपे व चॅनलची स्वच्छता करून संपूर्ण परिसर मोटरेबल ठेवण्याच्या सूचना दिल्या. नाट्यगृहाचे मुख्य काम पूर्ण झाले असून रंगकर्मी व सर्वसामान्य नागरिकांसाठी ते लवकरात लवकर सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे. रंगकर्मींशी सविस्तर चर्चा करून परवडणारे दर निश्चित करण्यात आले आहेत. वास्तूचे वैभव कायमस्वरूपी टिकविण्यासाठी नियमित स्वच्छता, योग्य सुरक्षा व तज्ज्ञ तंत्रज्ञांवर विशेष भर देण्यात येणार असून संपूर्ण नियंत्रण महापालिकेकडेच राहील. नाट्यगृहातील लाईट इफेक्ट, साऊंड सिस्टीम व इतर यंत्रणांची दररोज चाचणी घेण्याचे आणि निर्धारित वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, पोलिस निरिक्षक किरण लोंढे, उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande