आगमी 29 ऑगस्ट रोजी आंदोलन होणारच- मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, त्यापूर्
मनोज जरांगे


छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, त्यापूर्वी आज सरकारच्या शिष्टमंडळाने यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आता मागे हटणार नाही. 29 ऑगस्टला आंदोलन होणारच असल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिली आहे.

29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीत आंदोलन होणार आहे. ज्या नोंदी शोधल्या आहेत, त्या सर्वांची प्रमाणपत्र 28 ऑगस्टच्या आतमध्ये सरकारनं द्यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. आता आंदोलन थांबणार नाही, 29 ऑगस्टला आंदोलन होणार असल्याचे पाटील म्हणाले.

28 ऑगस्टच्या आत निर्णयांची अंमलबजावणी करा

मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलतीबाबतचा निर्णय 28 ऑगस्टच्या लागू करा असी मागणी जरांगे पाटील यांनी केली. मराठा आंदोलकावरील केसेस मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा सांगितले आहे. बलिदान दिलेल्या बांधवांचा निधीचा विषय राहिला आहे, तो पूर्ण करा असेही सांगितले आहे. विशेष म्हणजे सातारा पुणे, बॉम्बे औंध गॅझेटर संबंधीचा जी आरची मागणी आहे, ती पूर्ण करा असेही सांगितल्याचे जरांगे म्हणाले. ज्यांचे प्रमाणपत्र, व्हॉलिडिटी राहिली असेल त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवाली मध्ये यावं असं आवाहन देखील जरांगेंनी केलं.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande