बुरूड समाजाच्या विविध प्रलंबित मागण्याच्या संदर्भात बैठक
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीतबुरूड समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या, समस्या आणि सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी समाजाच्या प्रतिनिधींकडून विविध मागण्या व अडचणी जाणून घेत त्यावर
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीतबुरूड समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या, समस्या आणि सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात बैठक घेण्यात आली.

यावेळी समाजाच्या प्रतिनिधींकडून विविध मागण्या व अडचणी जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेत, बुरूड समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक आणि प्रभावीपणे कार्यवाही करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

बुरूड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande