धारूर शहरात एक कोटींच्या निधीतून साकारणार ‘नमो उद्यान’
बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)। धारूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि नागरिकांना विरंगुळा, व्यायाम व मनोरंजनाची सुविधा मिळावी, यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीतून ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत या उद्यानाच्या
नमो उद्यान


बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

धारूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि नागरिकांना विरंगुळा, व्यायाम व मनोरंजनाची सुविधा मिळावी, यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीतून ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत या उद्यानाच्या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. उद्यानात खुली व्यायामशाळा, पादचारी मार्ग, आकर्षक कारंजे, ओपन स्टेज, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि विविध आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहराच्या विकासाला चालना देणारे हे उद्यान नागरिकांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande