
बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)१० कोटींच्या निधीतून साकार होणार किल्ले धारूरचे नवे बसस्थानक, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली
किल्ले धारूर बसस्थानकाच्या कामाबाबतीत काही तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे येत्या ३ महिन्यांत सुमारे १० कोटी रुपये निधीच्या आधुनिक बसस्थानकाच्या कामाला सुरुवात व्हावी, यासाठी शासनाकडून आवश्यक मान्यता मिळविण्याच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.निश्चितपणे हे काम नजिकच्या काळात सुरू होईल हा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या प्रस्तावित बसस्थानकामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, मिनी थिएटरसह प्रवाशांना आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे किल्ले धारूरच्या या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप मिळेल.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी ही केवळ प्रवासाचे साधन नाही, तर शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनाशी जोडणारी जीवनवाहिनी आहे. त्यामुळे धारूर आगारात दाखल झालेल्या नव्या बसेसपासून ते आधुनिक बसस्थानकाच्या उभारणीपर्यंत प्रत्येक प्रयत्नामागे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सेवा मिळावी,हाच उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis