भाजप, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। दर्शना बंगला येथे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि काँग्रेस पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. जालना काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष अतिक
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। दर्शना बंगला येथे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि काँग्रेस पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

जालना काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष अतिक खान, भाजप प्रदेश सचिव कामगार मोर्चा जुनेद मिर्झा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

तसेच जालना काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इरशाद शेख यांनीही आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना जनसेवेचा संदेश दिला.

आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, राजकारण हे केवळ पदासाठी किंवा सत्तेसाठी नसून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असते. शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाच्या प्रक्रियेत योगदान देणे हीच खरी जनसेवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नवीन कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासोबतच जनतेच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे. नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत आणि गरजू व्यक्तींना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही आमदार खोतकर यांनी केले.

“शिवसेनेत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान आणि काम करण्याची संधी दिली जाईल. संघटना मजबूत करण्यासोबतच जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

जालना शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असून, पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वासही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.

----------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande