
बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)७ लाख रुपये निधीतून खुली व्यायामशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहेनिरोगी आरोग्य आणि सदृढ शरीरासाठी नियमित व्यायामाची सवय असणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने काडीवडगाव येथील ग्रामस्थांनी खुल्या व्यायामशाळेची मागणी केली होती.ग्रामस्थांच्या या मागणीची पूर्तता करत जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत ७ लक्ष रुपये निधीतून खुल्या व्यायामशाळेचे काम पूर्ण करण्यात आले. या व्यायामशाळेचा काडीवडगाव येथे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या खुल्या व्यायामशाळेमुळे गावातील नागरिकांना नियमित व्यायामासाठी सुविधा उपलब्ध झाली असून, निरोगी आणि सदृढ आरोग्य निर्मितीस निश्चितच हातभार लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis