
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।
वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच तरुणांकडून मारहाण झाल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबड तालुक्यातील भोकरवाडी टोलनाक्यावर वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच तरुणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पाचोड येथील काही तरुण टोलनाक्यावर वाद घालत असल्याची माहिती ११२ क्रमांकावरून पाचोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस पोहोचल्यानंतरही संबंधित तरुणांनी त्यांच्याशी वाद घातल्याचे समोर आले.
याचदरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याला तरुणांनी मारहाण केल्याची माहिती आहे. हा संपूर्ण प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेप्रकरणी अंबड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis