
पिंपरी, 24 ऑगस्ट (हिं.स.)उपग्रह तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि क्वांटम तंत्रज्ञान ही भविष्यातील डिजिटल जगाची महत्त्वाची क्षेत्रे आहेत. या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून ‘चांगल्या डिजिटल जगाची’ निर्मिती करावी. भारताने या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करणे आवश्यक आहे. एनएवीएलसी सारख्या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे दळणवळण, नेव्हिगेशन आणि संरक्षण क्षेत्राला मोठी ताकद मिळते. भविष्यात स्मार्टफोन पासून उपग्रह संप्रेषण पर्यंत तंत्रज्ञान अधिक सक्षम आणि सर्वव्यापी होईल. या परिवर्तनात भारतातील तरुण संशोधक महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा स्पेस एप्लिकेशन्स सेंटर अहमदाबाद चे माजी संचालक डॉ. निलेश देसाई यांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे 'चांगल्यासाठी तंत्रज्ञान: एक उत्तम डिजिटल जगाची उभारणी' या विषयावर आधारित १० व्या आयइइइ संगणक संचार नियंत्रण आणि स्वचालन २०२६ (आयसीसीयूबीइए) सिग्नल प्रोसेसिंग सोसायटी पुणे चॅप्टर यांच्या सहकार्याने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी निलेश देसाई बोलत होते.
यावेळी आयसीसीयूबीइए २०२६ च्या स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बीआयटीएस) पिलानी समूह कुलगुरू डॉ. व्ही. रामगोपाल राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता (प्रभारी) डॉ. रावसाहेब लटपटे, आयइइइ पुणे सेक्शनचे प्रतिनिधी डॉ. मंदार भवाळकर, पीसीसीओइ चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीइटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, आयसीसीयूबीइए २०२६ च्या जनरल चेअर डॉ. सोनाली पाटील, व्हा. जनरल चेअर डॉ. वर्षा के. हरपळे, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु