अमरावती : जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
अमरावती, 24 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात सोमवारी पहाट लागलेल्या भीषण आगीत तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा बालकांना बाहेर काढण्यात आले असले तरी त्यापैकी काही बाळांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर
एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार


एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार


अमरावती, 24 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात सोमवारी पहाट लागलेल्या भीषण आगीत तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा बालकांना बाहेर काढण्यात आले असले तरी त्यापैकी काही बाळांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शेजारी असणाऱ्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवजात शिशू कक्षात सोमवारी पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली. ही आग वेगाने पसरत गेली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर दोन परिचारिकांच्या प्रसंगावधानामुळे या कक्षात असलेल्या सहा बाळांचा जीव वाचल्याची माहिती आता समोर येत आहे. या दोन परिचारिकांनी इवल्याशा बाळांसाठी अक्षरश: स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या बाळांचा जीव वाचवला.या दोन परिचारिकांनी या सगळ्या घटनेबाबत माहिती सांगितली . त्यांनी म्हटले की, आम्हाला समोर फक्त लहान मुलं दिसत होती. आग खूपच भीषण होती. मात्र, आम्ही आम्हाला काय होईल याचा विचार केला नाही. आम्ही या कक्षात ठेवण्यात आलेल्या पेटीतील बाळांना बाहेर काढले. आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र, या कक्षात आगीमुळे सर्वत्र धूर पसरला होता. आम्हाला काहीच दिसत नव्हते. त्यामुळे तीन बाळांना वाचवता आले नाही. बाळांना वाचवताना आगीमुळे आमचे हात भाजले. या परिचारिकांनी त्यांचे भाजलेले हात सुद्धा यावेळी दाखविले.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande