
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील कुणाल आणि त्याच्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांचा पाळीव कुत्रा ‘शेरू’ अनाथ झाला. आपल्या मालकांचे काय झाले, याची कल्पनाही नसलेला शेरू त्यांच्या परतीची वाट पाहत घरातच बसून होता.
शेजाऱ्यांनी त्याला बिस्किटे आणि पोळी देण्याचा प्रयत्न केला; मात्र शेरूने अन्नालाही तोंड लावले नाही. त्यानंतर शेरूला ‘आपला पेट लव्हर असोसिएशन’कडे सोपवण्यात आले. दरम्यान, म्हाडा कॉलनीतील शैलेश माने यांनी शेरूचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली.
माने यांच्या रूपाने शेरूला आता प्रेम, माया आणि सुरक्षित निवारा मिळाला आहे. या वेळी बेरिल सांचीस, डॉ. कुणाल दत्ता, रितेश होळकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis