दोन तास अभ्यासासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी!
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे प्रत्यक्ष आ. राणादादांनी भेट देऊन विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांशी संवाद साधला ‘आपला जीव धाराशिव – Vision 2030’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेअंतर्गत जिल्हाभरात सायंकाळी ७ ते
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे प्रत्यक्ष आ. राणादादांनी भेट देऊन विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांशी संवाद साधला

‘आपला जीव धाराशिव – Vision 2030’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेअंतर्गत जिल्हाभरात सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल व टीव्ही बंद ठेवून मुलांना अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचे जनजागृती अभियान राबविले जात आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.

दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत घरातील मोबाईल, टीव्ही आणि इतर मनोरंजनाची साधने बंद ठेवून मुलांना शांत वातावरणात अभ्यासासाठी वेळ देण्याचे आवाहन करण्यात आले. पालकांनीही या दोन तासांत मुलांसोबत बसून त्यांच्या अभ्यासात सहभागी व्हावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

आज मनोरंजनाला दिलेला दोन तासांचा विराम हा मुलांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सवय, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होण्याबरोबरच कुटुंबातील संवादही अधिक दृढ होण्यास हातभार लागणार आहे.

कसबे तडवळे येथील ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पूर्ण पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सायंकाळी ७ ते ९ – अभ्यासासाठी दोन तास’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी श्री. नेताजी पाटील, श्री. दत्तात्रय देवळकर, श्री. नाना वाघ यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande