
सोलापूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी, श्रावणी सोमवार तसेच शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल ८ ते १० तास प्रतीक्षा करावी लागत आहे. गर्दी वाढल्याने दर्शनरांगेचे नियोजन आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण आला आहे.
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने भाविकांचे हाल होत आहेत. भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. गर्दीचे नियोजन करताना प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवरही अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. पुत्रदा एकादशी आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर्शनासाठीचा प्रतीक्षा कालावधी ८ ते १० तासांवर पोहोचला आहे. त्यामुळे भाविकांना सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड