बळीराजाच्या समृद्धीसाठी देवाभाऊंचा ठाम संकल्प!
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। करंजगाव, ता. वैजापूर येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्या समवेत शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शेतीशी संबंधित विविध प्रश्न जाणून घेतले.
अ


छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.)।

करंजगाव, ता. वैजापूर येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्या समवेत शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शेतीशी संबंधित विविध प्रश्न जाणून घेतले.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. दिनेशभाऊ परदेशी, वैजापूर कृ.उ.बा.स.चे सभापती श्री. कल्याण दांगोडे , जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, वीजबिल माफी तसेच शेतकरी हिताच्या विविध योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

“बळीराजाच्या अडचणी समजून घेऊन त्या शासन दरबारी मांडण्यासाठीच आम्ही तुमच्यात आलो आहोत,” असा विश्वास भाजपा पदाधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांना दिला. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याबद्दल शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर जगताप, श्री. गोरख घायवट यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande