नेपाळमध्ये पूरस्थिती; बीड जिल्ह्यातील पर्यटकांना प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन
बीड, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीड
नेपाळ पूरस्थिती


बीड, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील कोणतेही पर्यटक नेपाळमध्ये पूरस्थितीमुळे अडकले असतील किंवा त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर संबंधित पर्यटकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये असलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधितांनी सोबत दिलेल्या ऑनलाईन लिंकवर आवश्यक माहिती भरावी, जेणेकरून प्रशासनाला संबंधित व्यक्तींची माहिती संकलित करून आवश्यक ती मदत व कार्यवाही करणे शक्य होईल.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :

टोल फ्री : १०७७

जिल्हा नियंत्रण कक्ष, बीड : ०२४४२-२९९२९९

नेपाळमधील पूरस्थिती लक्षात घेता बीड जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या कुटुंबातील किंवा परिचित व्यक्ती नेपाळमध्ये असल्यास त्यांची सुरक्षितता तपासावी आणि संपर्क होत नसल्यास विलंब न करता प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande