परभणीत ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त भव्य जुलूस
परभणी, 26 ऑगस्ट (हिं.स.)। ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मार्कजी जुलूस-ए-मिलाद उन नबी स. कमिटीच्या वतीने परभणी शहरात बुधवारी भव्य जुलूस-ए-मिलाद काढण्यात आला. शहरातील विविध भागांतून नागरिक, युवक आणि मिलादप्रेमी मोठ्या संख्येने या जुलूसमध्ये सहभागी झाले. त
मार्कजी जुलूस-ए-मिलाद कमिटीच्या वतीने परभणीत जोरदार जुलूस-ए-मिलाद


परभणी, 26 ऑगस्ट (हिं.स.)। ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मार्कजी जुलूस-ए-मिलाद उन नबी स. कमिटीच्या वतीने परभणी शहरात बुधवारी भव्य जुलूस-ए-मिलाद काढण्यात आला. शहरातील विविध भागांतून नागरिक, युवक आणि मिलादप्रेमी मोठ्या संख्येने या जुलूसमध्ये सहभागी झाले. त्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या भव्य जुलूसचे नेतृत्व परभणीतील उलेमांनी केले. जुलूसमध्ये सहभागी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने ईद-ए-मिलादुन्नबीचा आनंद साजरा केला. जुलूसच्या मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जुलूसला मोठा प्रतिसाद मिळाला.

जुलूसचे संयोजक सय्यद गाझी जावेद होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सय्यद इकबाल, अली खान, जाकेर लाला, अलीम कुरेशी, सिकंदर कोठारी, शेख इब्राहिम बसेरा, मौलाना अहमद रझा, मौलाना स. निसार, मौलाना फरखान, नबील देशमुख, मौलाना मेराज मदनी, हाफिज शोएब, हाफिज वसीम, मो. इम्रान रुबी, सईद अन्सारी, सय्यद मतीन, बेलदार वसीम पाशा, अबुझर हुसैनी, स. सलीम जावेद, अदनान हुसेन, सलमान, फरहान हाश्मी आणि सफीउद्दीन आमेर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या जुलूसमध्ये शहरातील विविध भागांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नागरिकांनी शांततेत आणि उत्साहाने सहभागी होत ईद-ए-मिलादुन्नबीचा आनंद साजरा केला.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande